जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर – श्रीमद्भगवद्गीता
श्रीमद्भगवद्गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर केलेला तत्वचिंतनात्मक उपदेश. मानवी जीवनसुद्धा एक युद्धभूमी असून प्रत्येकाला आपले जीवनप्रश्न व समस्या सोडविण्यासाठी एका आदर्श मार्गदर्शकाची आवश्यकता असते. ख-या ज्ञानाची गरज भासते. मानवी जीवन हे जेंव्हा काय करावे? व काय करू नये? अशा द्वंवद्ववामध्ये सापडते तेव्हा कोणता विचार अंगिकारावा हा प्रश्न पडतो. त्यावेळी एकच भगवद्गीता विचार आपल्या सर्व प्रश्नांना उत्तर शोधुन देऊ शकतो. मानवी जीवनात उत्पन्न होणा-या अनेक परस्थितीतींची व प्रश्नांची उत्तरे या ग्रंथातून प्राप्त होतात. म्हणून प्रत्येकाने हा गीता विचार अंगिकारला पाहिजे. जीवनातील अडचणी सोडविण्यासाठी सांगितलेले जीवनावश्यक तत्वज्ञान श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथात आहे.